६१ व्या नंबरवर घेतली खा. खडसेंनी शपथ : रावेर मतदारसंघात जल्लोष
जळगाव (प्रतिनिधी) : रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या खासदार रक्षा खडसे या तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्यांना दोन लाखांपेक्षा अधिक लीड मिळाली आहे. आता त्यांची राज्यमंत्रीपद निवड झाली. रविवारी दि. ९ जून रोजी रक्षा खडसे यांनी मंत्रिपदाची हिंदीतून शपथ घेतली.
नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात जळगाव जिल्ह्यातील दोन्ही खासदारांची नावे चर्चेत होती. मात्र तिसऱ्यांदा हॅट्ट्रिक साधणाऱ्या रक्षा निखिल खडसे यांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली आहे. त्यांनी ६१ व्या क्रमांकावर हिंदीतून शपथ घेतली. त्यां शपथ घेत असताना रावेरसह जळगाव मतदारसंघात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. त्यांना आरोग्य, महिला व बालविकास किंवा शिक्षण यापैकी एक खाते मिळू शकते अशी चर्चा आहे.