जळगाव (प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने गट ब संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यात जळगाव जिल्ह्यातील ४ तालुका कृषी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यतील ५ तालुक्यांवर बाहेरून ५ अधिकारी येत आहेत. अवर सचिव अ. नि. साखरकर यांच्या सहीनिशी परिपत्रक जाहीर झाले आहे.
भडगाव येथील तालुका कृषी अधिकारी भगवान बाबुराव गोर्डे यांची मालेगाव येथे बदली झाली आहे. त्याचप्रमाणे अमळनेर तालुका कृषी अधिकारी भरत वामन वारे यांची यावल येथे, चाळीसगाव येथील चंद्रशेखर देविदास साठे यांची धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे तर एरंडोल येथील शरद साहेबराव बोरसे यांची भुसावळ येथे बदली झाली आहे. तर चाळीसगाव येथे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथून किशोर एकनाथ हडपे येत आहेत.
पारोळा येथे तालुका कृषी अधिकारी म्हणून नगर जिल्ह्यातील नेवासा येथून दत्तात्रय पोपट डमाळे येत असून, एरंडोल येथे नाशिक येथून ज्ञानदेव पांडुरंग गंभीरे येत आहेत. जामनेर येथे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून संदीप सत्तारसिंग वळवी, अमळनेर येथे धुळेवरून चंद्रकांत जेजीराम ठाकरे, भडगाव येथे वर्धावरून परेशचंद काशिनाथ बागले येत आहेत. तसेच, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात तंत्र अधिकारी म्हणून धुळे येथून गणपत तुकाराम घोंगडे येत आहेत.