लाभ घेण्याचे शासनाचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : महिला व बाल विकास मंत्रालय नवी दिल्ली यांच्या दिनांक ३१ मार्च २०२३ रोजीच्या पत्रान्वये मिशन वात्सल्य योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्य व जिल्हा मार्फत चाईल्ड हेल्प लाईनची सेवा १ सप्टेंबर २०२३ पासून संपुर्ण राज्यात कार्यान्वित करण्यात आलेली आहे. तसेच सदर सेवा गृह मंत्रालय नवी दिल्ली यांच्या आपत्कालीन प्रतिसाद समर्थन प्रणाली ११२ हेल्पलाईनसह एकत्रित केली आहे.
या चाईल्ड हेल्प लाईन १०९८ असे अंतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या संकटात सापडलेले मुदतीची आवश्यकता असलेले अशा सर्व बालकांना योग्य वेळी आवश्यक ती मदत उपलब्ध व्हावी म्हणून सातही दिवस २४ तास निरंतर कार्यरत महिला व बाल विकास विभागाची चाईल्ड हेल्प लाईन सेवा आहे बालकांना कोणताही अडथळा शिवाय जलद गतीने सेवा उपलब्ध व्हावी, या करिता राज्य स्तरावरुन महाराष्ट्र राज्य चाईल्ड हेल्प लाईन नियंत्रण कक्ष, जिल्हा स्तरावर जिल्हा चाईल्ड हेल्प लाईन कक्ष व राज्यातील १२ जिल्हयात १६ रेल्वे स्थानकावर रेल्वे चाईल्ड हेल्प लाईन डेक्स कार्यान्वीत आहे. तरी केंद्र शासनाच्या या योजनेचा फायदा जास्तीत जास्त बालकांना मिळावा व चाईल्ड हेल्प लाईन १०९८ हा नंबर प्रत्येक संकटग्रस्त / मदतीची आवश्यकता असलेल्या बालकां पर्यंत पोहोचवा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगते यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.