कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांनी संगीतात रियाजाला महत्व असून यासाठी वेळेचे नियोजन करणे गरजेचे असते असे सांगत संगीतामूळे मानवाला जगण्याची नवी उमेद मिळत असते. परीक्षकांनी लहान लहान पराभवातून माणूस शिकतो आणि मोठा होतो त्यामूळे या स्पर्धेत यश आले नाही तरी नाउमेद होउ नका आपल्या गाण्यातील चुका शोध कारण यातून नवीन कला निर्मीती होउ शकेल असे सांगत दर्जा काय असतो तो या स्पर्धेतून बघायला मिळाला असे सांगीतले तर डॉ. वैभव पाटील यांनी मोठा होत असतांना अनेकदा गायक कलाकारांचा हेवा वाटायचा पण आता मी मोठा झाल्यावर कळते की यासाठी परीश्रम, जिदद् व योग्य मार्गदर्शनाची गरज असते. कलाकारांसाठी गोदावरी संगीत महाविद्यालय हे खुले व्यासपीठ सूरु केल्यावर आपण सगळ्यांनी दिलेला प्रतिसाद यावर ही यशस्वी वाटचाल सुरु राहील असे आश्वासन त्यांनी दिले. एकुण 80 स्पर्धकांनी नाव नोंदणी केली होती.
बाल गट
प्रथम क्रमांक काव्या शरद पवार, (जळगांव) (मी वायाच्या वेगाने आले)
द्वितीय आराध्य भुषण खैरनार (जळगांव) (मन चिंब पावसाळी )
तृतीय मीत रोहीत साळवे (जळगांव) ( मला न कळते सारेगम)
उत्तेजनार्थ स्वरा आनंद जगताप (जळगांव) ( कोणास ठाउक कसा )
उत्तेजनार्थ गीत रोहीत साळवे (जळगांव) ( नाविका रे वारा वाहेरे )
किशोर गटात
प्रथम क्रमांक मानस गोपाळ पाटील (वरणगांव ) ( दिवस तुझे हे फुलायचे)
द्वितीय नंदिनी किशोर शिंदे (जळगांव) (फुलले रे क्षण माझे)
तृतीय समर्थ पुरषोत्तम पाटील (जळगांव) ( गारवा )
उत्तेजनार्थ ऋतुराज सतिष जोशी ( जळगांव) (आताच अमृताची)
उत्तेजनार्थ पियुषा नागेश नेवे ( जळगांव) (केव्हा तरी पहाटे )
प्रौढ गटात
प्रथम क्रमांक डॉ. सचिन संतोष खोरखेडे (औरंगाबाद) ( सजल नयन )
द्वितीय वर्षा मंगेश कुळकर्णी (जळगांव) ( रसिका मी कैसे गाउ)
तृतीय नाजनिन शेख (जळगांव) (सावनात घना निळा बरसलां)
उत्तेजनार्थ धनश्री दिनेश जोशी (जळगांव) (मी राधिका )
उत्तेजनार्थ प्रणव विनोद ईखे (जळगांव) (तुला पाहिले रे)
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महिमा मिश्रा, तर सुत्रसंचालन निकीता जोशी, सौ. प्रियंका महाजन, सौ. किरण सोनी यांनी केले. स्पर्धेची साथसंगात संवादिनी वर श्री. सुशिल महाजन, श्री. भुषण खैरनार, तर तबला श्री. प्रविण महाजन, श्री. देवेद गुरव यांनी केली कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी केंद्र व्यवस्थापक श्री. राजु पाटील, अनंता साठे, किशोर चौधरी, यांनी परिश्रम घेतले.