जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांचेकडे प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने ०९ ऑगस्ट रोजी आयोगामार्फत सुनावणीचे आयोजन करण्यात आलेले असून सदर सुनावणीसाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲङ सुशीबेन शाह, सचिव मा. डॉ. भालचंद्र चव्हाण (भा. प्र. से), आयोगाच्या सदस्या अॅड निलिमा चव्हाण, अॅड.संजय सेंगर, अॅड प्रज्ञा खोसरे, अॅड. जयश्री पालवे, सायली पालखेडकर, चैतन्य पुरंदरे तसेच आयोगातील अधिकारी प्रमोद बाडगी, माधवी भोसले, उज्वला होवाळ, अजय लोंढे हे उपस्थित असणार आहेत. सदर सुनावणीचे आयोजन शुक्रवार दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे करण्यात आलेले आहे. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी केले आहे.