जळगाव ( प्रतिनिधी ) – “जागतिक कर्करोग दिनी ” कर्करोगतज्ज्ञ डॉ . नितीन चोधरी यांचा भाजप वैद्यकीय आघाडीकडून आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला .
आमदार राजूमामा भोळे म्हणाले की , कर्करोगाचे निदान झाल्यावर रुग्णासोबतच सगळे कुटुंब हताश होते . कर्करोग म्हणजे मृत्यू व कर्करोगाचे उपचार अत्यंत खर्चिक असतात हा गैरसमज आजही आहे .कर्करोगाच्या किमोथेरपीसारख्या उपचाराची सुविधा सेवाभावी वृत्तीने जळगावात उपलब्ध करून देत रुग्ण व कुटुंबियांना कर्करोगातून मुक्त होण्याचा विश्वास व मानसिक आधार देण्याचे मोलाचे कार्य डॉ .नितीन चोधरी यांचे आहे .
जळगाव जिल्हा व महानगर भाजप वैद्यकीय आघाडीतर्फे आयोजित या सोहळ्यात जिल्ह्यातील एकमेव कर्करोग स्पेशालिस्ट डॉ . नितीन चोधरी यांचा सत्कार करण्यात आला. डॉ नितीन चोधरी यांच्या जळगाव येथील जीवनज्योती कॅन्सर हॉस्पिटलमधील कर्मचारीवर्गाचेही आमदार राजूमामा भोळे यांनी कॊतुक केले .भाजप वैद्यकीय आघाडीकडून जागतिक कर्करोग दिनानिमित्त आयोजितया कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संयोजक डॉ . नरेंद्र ठाकूर यांनी व आभार प्रदर्शन महानगर संयोजक डॉ . धर्मेंद्र पाटील यांनी केले .