गोदावरी आय.एम.आर. व डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये आदरांजली
जळगाव ( प्रतिनिधी ) : राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त १७ जून रोजी गोदावरी आय.एम.आर. महाविद्यालय तसेच डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर प्लिकेशन येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून जिजाऊंना आदरांजली अर्पण केली. गोदावरी आय.एम.आर. महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात डॉ. चेतन सरोदे यांनी आपल्या मनोगतात राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार, शौर्य आणि स्वराज्याची प्रेरणा दिली. तर डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर प्लिकेशनमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रा. वैजयंती असोदेकर यांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील दूरदृष्टी, नेतृत्वगुण आणि राष्ट्रनिष्ठा यांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन केले. जिजाऊंनी शिवरायांना केवळ पराक्रमी योद्धा नव्हे तर रयतेचे हित जपणारे दूरदर्शी राजे म्हणून घडविले, असेही त्यांनी नमूद केले.दोन्ही महाविद्यालयांतील कार्यक्रमांना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोदावरी आय.एम.आर. महाविद्यालयातील कार्यक्रमाचे आयोजन प्रा. स्मिता चौधरी यांनी, तर डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमधील कार्यक्रमाचे आयोजन प्रा. शिवानी महाजन यांनी केले.