• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खडसे घराण्याचे काही समजतच नाही बुवा… सुरुवातीला सुन विरुद्ध सासरे तर आता वडील विरुद्ध मुलगी..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 7, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खडसे घराण्याचे काही समजतच नाही बुवा… सुरुवातीला सुन विरुद्ध सासरे तर आता वडील विरुद्ध मुलगी..!

एकनाथरावांची घर वापसी पण रोहिणीताईंच्या हातात तुतारी कायम

जळगाव (प्रतिनिधी) : देशात लोकसभेसाठी निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघांमध्ये तर आश्चर्यजनक घडामोडी घडत आहेत. नेहमीप्रमाणे राजी-नाराजीचे सुर आहेत. अशा वातावरणात मुक्ताईनगरचे प्रसिद्ध खडसे घराण्याचं मात्र काही समजतच नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. सुरुवातीला सून विरुद्ध सासरे असे चित्र असताना आता वडील विरुद्ध मुलगी असे चित्र जनतेला पाहायला मिळणार आहे.

एकनाथराव खडसे हे नाव महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. प्रबळ विरोधी पक्षनेता ते बारा खात्यांचे मंत्री अशी त्यांची ओळख असताना अचानक त्यांच्याभोवती विविध आरोप-प्रत्यारोप लावून तसेच खटले टाकून त्यांना नामोहरम करण्याचे प्रयत्न पक्षांतर्गत करण्यात आल्याचे आरोप झाले. त्यांच्यामागे पुण्यातील भोसरी प्रकरण, दाऊद इब्राहिमच्या पत्नीशी संभाषण प्रकरण यासोबत आता मुक्ताईनगरतील उत्खनन प्रकरण लावण्याचे प्रयत्न झाल्याचे आरोप खडसे यांनी केले होते. या सर्व घडामोडीत एकनाथराव खडसे यांच्या सून रक्षा खडसे ह्या दोन वेळा खासदार झाल्या. आता तिसऱ्यांदा त्यांना तिकीट मिळाले आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोप प्रत्यारोपांना व खटल्यांना तसेच भाजप अंतर्गत कुरघोड्यांमुळे त्यांनी तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून शरद पवार यांच्याशी हात मिळवणी केली.

मात्र सून रक्षा खडसे या भाजपामध्येच राहिल्या. त्यामुळे सुनबाई भाजपमध्ये तर एकनाथराव राष्ट्रवादीमध्ये होते. पण कधीही एकमेकांविरोधात त्यांनी आरोप प्रत्यारोप केलेली नाहीत. आता त्यांच्यावर पुन्हा भाजपमध्ये जाऊन घरवापसी करण्याची वेळ आल्यावर मात्र आणखी एक बातमी समोर आली. एकनाथराव यांच्या कन्या व त्यांच्यासोबत सावलीसारख्या राहणाऱ्या ॲड. रोहिणीताई खडसे यांनी मात्र आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार असल्याची घोषणा सोशल मीडियावरून केली आहे. त्यामुळे सून व सासरे भाजपामध्ये राहतील आणि त्यांची कन्या ही विरोधी पक्षात म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात राहतील. या सर्व घडामोडी मध्ये खडसे घराण्याचे काही समजतच नाही बुवा.. अशा प्रतिक्रिया जनतेमधून उमटत आहेत.


 

 

Previous Post

ठाणांग सूत्र आगम मध्ये संपूर्ण जीवनाचा सार- प.पू.विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा.

Next Post

रेल्वेतून पडल्याने तरूणाचा जागीच मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेल्वेतून पडल्याने तरूणाचा जागीच मृत्यू

रेल्वेतून पडल्याने तरूणाचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीत शोककळा : भरधाव महिंद्रा पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
1xbet russia

शिरसोलीत शोककळा : भरधाव महिंद्रा पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

February 15, 2026
शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

February 15, 2026
गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक
1xbet russia

गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक

February 15, 2026
भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला
1xbet russia

भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीत शोककळा : भरधाव महिंद्रा पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

शिरसोलीत शोककळा : भरधाव महिंद्रा पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

February 15, 2026
शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon