कुऱ्हा सरपंच डॉ.बी.सी. महाजन यांचे प्रतिपादन
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : कुऱ्हा- कुंड धरणाची उंची वाढवण्याचा प्रश्न रोहिणी खडसे यांनी यशस्वी करून मार्गी लावला होता त्यांच्यामध्ये पाठपुरावा करून प्रश्न सोडवण्याची धमक आहे. कुऱ्हा वढोदा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी त्या पाठपुरावा करतील. कुऱ्हा परिसराने कायम आ.एकनाथराव खडसे यांना साथ दिली. आता रोहिणी खडसे यांच्या पाठीशी उभे राहून, त्यांना बहुमताने विजयी करावे, असे आवाहन कुऱ्हा सरपंच डॉ.बी.सी. महाजन यांनी उपस्थित नागरिकांना केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,महाविकास आघाडीच्या मुक्ताईनगर मतदारसंघाच्या उमेदवार रोहिणी एकनाथराव खडसे यांनी कुऱ्हा, थेरोळा, तालखेडा, उमरे, जोंधनखेडा, हिवरा, राजुरा, बोरखेडा, काकोडा पारंबी येथे जेष्ठ नेते रविंद्र पाटील यांच्या उपस्थितीत मतदार संवाद दौरा काढून मतदारांशी संवाद साधून मतदारांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांना मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी बोलतांना डॉ.बी.सी. महाजन म्हणाले, कुऱ्हा वढोदा परिसरातील शेती सिंचित होऊन कोरडवाहू परिसर हिरवागार होऊन शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी आ.एकनाथराव खडसे यांनी कुऱ्हा वढोदा परिसर उपसा सिंचन योजना आणली. ती पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला परंतु द्वेषभावनेतून योजना पूर्णत्वास नेण्यासाठी निधी मिळाला नाही. ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी रोहिणी खडसे यांना मतदान करून विधानसभेत पाठवा. त्यासाठी पाठपुरावा करण्याची रोहिणी खडसे यांच्यामध्ये धमक आहे. मागील काळात रोहिणी खडसे यांनी सतत पाठपुरावा करून जोंधनखेडा येथील कुंड धरणाच्या भिंतीची उंची वाढवण्याचा प्रश्न मार्गी लावला, हे आपण अनुभवले आहे. त्यांचा पारंबी, हिवरा, जोंधनखेडा, कुऱ्हा परिसरातील शेतकऱ्यांना फायदा झाला. नाथाभाऊ यांचा विकासाचा वारसा पुढे नेऊन मतदारसंघाचा विकास करण्यासाठी रोहिणी खडसे यांना विजयी करण्याचे डॉ. बी.सी. महाजन यांनी आवाहन केले.
यावेळी विशाल महाराज खोले यांनी सांगितले की, कोरोना काळात कुऱ्हा येथे लोकसहभागातून कोविड केअर सेंटर उभारणीसाठी रोहिणी खडसे यांनी पुढाकार घेतला होता. सेंटर सुरू करण्यासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा केला. स्वखर्चातून कोविड सेंटर साठी तीस बेड आणि मास्क औषधे उपलब्ध करून दिले. गेल्या तीस वर्षांपासून आ.एकनाथराव खडसे हे कुऱ्हा वढोदा परिसराच्या उन्नतीसाठी झटत आहेत. विकासाची गंगा प्रवाहित करण्यासाठी त्या सक्षम उच्चशिक्षाविभूषित उमेदवार असून मतदारसंघाचे प्रश्न त्या सक्षमपणे विधानसभेत मांडून सोडवू शकतात. म्हणून आपण सर्वांनी त्यांना बहुमताने विजयी करावे, असे आवाहन बाजार समितीचे माजी सभापती निवृत्ती पाटील यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते