मुख्यमंत्रीपदाचे चित्र जवळपास स्पष्ट
मुंबई (वृत्तसेवा) : भाजपचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित करण्यात आले आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर एकमत झालं. त्यानंतर आता विधिमंडळ पक्ष बैठकीत संमत होण्याची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस हेच विराजमान होतील अशी आता औपचारिकता राहिली असल्याबाबत माहिती मिळाली आहे.
या बैठकीत निरीक्षक म्हणून इथे आलेले विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन देखील उपस्थित होते. विधानभवनातील भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आता भाजप विधिमंडळ पक्षनेत्याची बैठक होणार आहे. या बैठकीत रणधीर सावरकर हे गटनेता निवड बैठकीत संचलन करतील. तर सुधीर मुनगंटीवार व चंद्रकांत पाटील हे प्रस्ताव मांडतील. रविंद्र चव्हाण हे प्रस्तावाला अनुमोदन देतील, अशी माहिती समोर आली आहे.