नंदुरबारला हिना गावित विरुद्ध ॲड. गोवळ पाडवी लढत रंगणार
मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसकडून महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. जाहीर केलेल्या यादीमध्ये राज्यातील ७ जागा घोषित करण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये नंदुरबार, अमरावती, नांदेड, पुणे, लातूर, सोलापूर आणि कोल्हापूर या जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर पुण्यातून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
सोलापूरमधून प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांना तर नंदुरबारमधून अड. गोवळ पडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना व नांदेडमधून वसंतराव बळवंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर लातूरमधून शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महाविकास आघाडी कडून सर्वात प्रथम काँग्रेस पक्षाची यादी जाहीर झाली आहे त्यामुळे ४८ पैकी उरलेल्या ४१ जागांवर आता कोणते उमेदवार महाविकास आघाडीकडून जाहीर होतात याकडे सर्व मतदारसंघांमधील जनतेचे लक्ष लागून आहे.