जामनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील कासली-राहेरा गृप ग्रामपंचायच्या सरपंच भारती पाटील, भराडीचे सरपंच भागवत पाटील, माजी सरपंच भिमराव पाटील यांनी त्यांच्या सहकार्यासह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. याआधी हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधीत्व करीत होते. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचे माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी पुष्पगुच्छ देत भाजपचा रूमाल गळ्यात टाकुन स्वागत केले.
यावेळी संदिप महाले, शरीफ तडवी, अमीन तडवी, प्रदिप पाटील या सर्व कासली-राहेरा ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्यांनीही भाजप प्रवेश केला या प्रवेश सोहळ्याप्रसंगी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर, जिल्हा चिटणीस नवलसिंग पाटील, तालुका सरचिटणीस रवींद्र झाल्टे, राजमल भागवत, श्रीकांत पाटील, दिपक तायडे, बाळु चव्हाण, बाळु धुमाळ, युवराज पाटील आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.