जामनेर ( प्रतिनिधी ) – गाडेगाव परिसरातील विहिरीत तरूणाचा मृतदेह ८ ऑक्टोबररोजी आढळून आला होता. तरूणाचा खून करून विहिरीत फेकून देणाऱ्या मयताच्या मित्राला जामनेर पोलीसांनी अटक केली आहे.
गाडेगाव शिवारातील विहिरीत ८ ऑक्टोबररोजी अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. जामनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. राहूल पंढरी पवार (वय – २४ , रा. नेरी बुद्रुक ता. जामनेर) असे मयत तरूणाचे नाव असल्याची ओळख पोलीस तपासात पटली.होती त्यांच्या गळ्याला दोरी असल्याचे निदर्शनास आले. जामनेरचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी राहूल पवार यांच्या नातेवाईकांची चौकशी केली. त्यांच्या माहितीनुसार संशयित समाधान नारायण कुमावत ( रा. नेरी बुद्रुक ) याला ताब्यात घेतले.
दरम्यान आपणच राहूल पवारचा खून केला असल्याची कबुली समाधान कुमावत याने दिली राहूल पवार यांच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी समाधान कुमावत यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पाचोरा उपविभागीय अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण शिंदे, उपनिरीक्षक अंबादास पाथरवट, पो कॉ रमेश कुमावत, नीलेश घुगे, तुषार पाटील, अतुल पवार, संदीप पाटील आदींच्या पथकाने केला .