जळगाव ( प्रतिनिधी )– येथील सौ. सु.ग. देवकर प्रायमरी स्कूलचे शिक्षक सागर पाटील यांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था, राजपूत करणी सेना आणि गौरी उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मीनाक्षी चव्हाण व प्रमुख पाहुणे म्हणून गणेश अमृतकर, संदीपा वाघ, विलाससिंग पाटील, बी.एच.खंडाळकर, सुमित पाटील, ज्ञानेश्वर वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन त्यांनी विविध उपक्रम शालेय स्तरावर राबवले आहेत . पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे
सागर पाटील शिक्षक आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर सरचिटणीस व राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेत तालुका उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.