जामनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील पूरग्रस्त भागाला तात्काळ आवश्यक मदत कागदी घोडे न नाचवता द्या अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे

अतिवृष्टी आणि वादळामुळे तालुक्यातील जामनेर ओझर, टाकरखेडा, हिंगने बु , शेळगांव , तळेगांव, टाकळी खु, लहासर, सामरोद , रामपूर, तोंडापूर इ. गावासह तालुक्यात कपाशी , केळी , मका, सोयाबीन , तुर, ज्वारी, भुईमुंग , बाजारी यासह सर्व पिकांचे नुकसान होऊन जमीन खरवडून वाहून गेली घरांची पत्रे उडून गेली , जनावरे जखमी झाली व काही वाहून गेली आहेत
शेतकऱ्यांचे न भरूण निघणारे नुकसान झाले . तहसिलदार व प्रशासकीय अधिकारी , लोकप्रतिनिधी यांचे पाहणी दौरे झाले पण प्रत्यक्षात नागरीकांना व शेतकऱ्यांना कवडीची मदत मिळाली नाही प्रशासकीय अधिकाऱ्यांचे व लोकप्रतिनिधींचे हे पाहणी दौरे नसून पब्लिसिटी स्टंट करुन पुरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळत आहे पुरग्रस्त भागात पंचनाम्याचे कागदी घोडे न नाचवता जागेवर तात्काळ मदत दयावी नाहीतर संभाजी ब्रिगेडकडून पुरग्रस्तांसाठी संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा संभाजी ब्रिगेड अध्यक्ष राम अपार यांनी दिला आहे
यावेळी रियाज पिंजारी, उमेश कचरे, संदीप पाटील, प्रवीन गावंडे, दिलीप साळुंके, विशाल पाटील, सागर लव्हाळे, परमेश्वर थाटे, निवृत्ती , कीरण पाटील , विजय काकडे, संजय काकूडे, धोंडू सोनवने, विनोद पाटील, दिपक ढोणी, योगेश पाटील, सतीष पाटील , प्रभाकर साळवे ( जिल्हा अध्यक्ष ) हजर होते.







