पाचोरा ( प्रतिनिधी )– शहरातून वाहणाऱ्या हिवरा नदीच्या पुरात शिवकॉलनीमधील युवक देवेंद्र शिंपी (वय ४०) आज सकाळी साडेसहाच्या सुमारास कृष्णापुरीकडे जाण्याच्या प्रयत्नात पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेल्याची घटना घडली
स्थानिक नागरिक युवकाचा शोध घेत असून कर्तव्यावर असलेले पालिकेचे कर्मचारी उपस्थित नसल्याने युवक वाहुन गेल्याची धारणा स्थानिक नागरिकांमध्ये झाली आहे.
रात्री पाऊस जास्त असल्याने नदीला पूर आला आहे त्यामुळे नदी पार करून जाणे अडचणीचे असल्याने सदर युवक रात्री शहरातच नातेवाईकाकडे मुक्कामी थांबला होता मात्र सकाळी घरी परत येत असताना सकाळी ही घटना घडली पुलावरील पाणी अचानक पाणी वाढल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे या युवक प्रवाहात वाहून गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली .
अद्याप प्रशासनातील कोणीही वरिष्ठ अधिकाऱ्याने घटनास्थळी भेट दिली नसल्याची माहिती मिळाली आहे. दरवर्षी होणाऱ्या अशा घटनांमुळे व शहरवासीयांना होणाऱ्या गैरसोयीची दखल घेत आ.किशोर पाटील यांनी सुमारे १८ कोटीं रुपयांचा निधी आणत परिसरातील तीन पुलांचे काम सुरू केले आहे. मात्र या कामास अजून सुमारे वर्षभर कालावधी लागणार आहे.