जळगाव ( प्रतिनिधी ) – पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलची मेगा सुपर स्पेशालिटी ऑर्थोपेडिक बाह्य रुग्ण तपासणी ( ओ. पी. डी. ) सेवा आता जळगावमध्ये उपलब्ध झाली आहे . आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नामांकित सांधेरोपण तज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य ७ जानेवारीला जळगावात रुग्णांची तपासणी करणार आहेत .
रुग्णांनी गुढघेदुखी, खुब्याचे दुखणे, न जुळलेली हाडे मणक्याचे “स्पिप डिस्क” सारखे आजार तसेच इतर सांध्यांच्या विकारांवर आणि
दुखण्यांवर तपासणी, निदान आणि उपचार करून घ्यावे. हाडांच्या आणि सांध्यांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता या संधीचा लाभ घ्यावा
आणि योग्य उपचार व तपासणीसाठी नाव नोंदणी करावी असे आवाहन लोकमान्य हॉस्पिटलकडून करण्यात आले आहे
. ०७ जानेवारीरोजी आयकॉन हेल्थ केअर सर्व्हिसेस अँण्ड डायग्नोस्टिक सेंटर, महेश प्रगती मंडळ जवळ, रिंग रोड, महेश मार्ग, ( जळगाव ) येथे
सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी केली जाणार आहे . तपासणीला येतांना पूर्व नावनोंदणी आवश्यक आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी रुग्णांनी 9673859185 किंवा 8668794817 या क्रमांकांवर संपर्क साधावा , असे आवाहन करण्यात आले आहे .