अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी
या क्रमांकावर संपर्क 9673859185 ; 8668794817 साधा
जळगाव ( प्रतिनिधी ) – पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल यांची सुपर स्पेशालिटी ऑर्थोपेडिक ओ. पी. डी. आता जळगाव मध्ये सुरु झाली आहे . यामध्ये सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. श्याम ठक्कर रुग्णांची तपासणी करणार आहेत .
रुग्णांनी गुढघेदुखी, खुब्याचे दुखणे, टाचदुखी तसेच इतर सांध्यांच्या विकारांवर आणि दुखण्यांवर तपासणी, निदान आणि उपचार करून घ्यावे , असे आवाहन डॉ. श्याम ठक्कर यांनी केले आहे . हाडांच्या आणि सांध्यांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता या संधीचा लाभ घ्यावा आणि योग्य उपचार व तपासणीसाठी नाव नोंदणी करा असेही त्यांनी सांगितले .
शनिवारी ( दि. १५ जानेवारी रोजी ) आयकॉन हेल्थ केअर सर्व्हिसेस अँण्ड डायग्नोस्टिक सेंटर, महेश प्रगती मंडळ जवळ, रिंग रोड, महेश मार्ग, जळगाव येथे
सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत अस्थिरोग तज्ञ डॉ. श्याम ठक्कर रुग्णांची तपासणी करणार आहेत
तपासणीला येतांना पूर्व नावनोंदणी आवश्यक असून अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी 9673859185 किंवा 8668794817 या क्रमांकावर संपर्क साधावा , असे डॉ ठक्कर यांनी सांगितले.