मुंबई (वृत्तसंस्था ) – भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मॅचकडं संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं असंत. जगाच्या कोपऱ्यात कुठंही ही मॅच झाली तरी त्याला मोठी गर्दी होती.

2019 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कपनंतर पहिल्यादाच यंदा टी20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही टीममध्ये सामना झाला होता. त्यानंतर आता पुढच्या वर्षी या दोन्ही देशांच्या क्रिकेट टीम आमने-सामने येणार आहेत. कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये दोन्ही देशांच्या महिला क्रिकेट टीममध्ये ही मॅच होणार आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला क्रिकेटचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे.
यापूर्वी 1998 साली मलेशियात झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत पुरूषांच्या क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. आता महिला क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान टीम मेडल जिंकण्याच्या उद्देशानं एकमेकांच्या विरुद्ध खेळणार आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ECB) अधिकाऱ्यानं या विषयावर सांगितलं की, ‘कॉमनवेल्थ गेम्समधील महिला क्रिकेटची सुरूवात 29 जुलै रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) या मॅचनं होणार आहे. 7 ऑगस्टपर्यंत क्रिकेटचे सामने होतील.
टीम इंडिया ऑस्ट्रेलियानंतर बार्बोडस आणि पाकिस्तान विरुद्ध सामना खेळणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील मॅच 31 जुलै रोजी होणार आहे. तर टीम इंडियाचा ग्रुपमधील शेवटची मॅच 3 ऑगस्ट रोजी बार्बाडोस विरुद्ध होईल. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान मॅच देखील त्याच दिवशी होणार आहे.
यजमान इंग्लंडची पहिली मॅच 30 जुलै रोजी पात्रता फेरीतून पुढे आलेल्या टीम विरुद्ध होणार आहे. ‘विराट कोहली ‘या’ कारणांमुळे कॅप्टनसी सोडणार’, रवी शास्त्रींचा दावा कॉमनवेल्थ स्पर्धेत 8 देशांच्या महिला टीम सहभागी होणार आहेत. या टीमची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली असून दोन्ही टीममध्ये प्रत्येकी 4 टीम आहे. ग्रुप A मध्ये भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि बार्बाडोसचा समावेश आहे. तर ग्रुप B मध्ये इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पात्रता फेरीतील विजेती टीम असेल. प्रत्येक गटातील टॉप 2 टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. 6 ऑगस्ट रोजी सेमी फायनल तर 7 ऑगस्ट रोजी मेडलसाठी सामने होतील.







