पुणे (वृत्तसंथा) – एमएसएलटीए योनेक्स सनराईज एपीएमटीए अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज 12 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऋषिकेश रामनाथन, अमोघ दामले, कर्नाटकाच्या दिशा बेहेरा या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना-आदर पुनावाला टेनिस अकादमी येथील टेनिस कोर्टवर सुरू झालेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये पहिल्या फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या बिगरमानांकित ऋषिकेश रामनाथन याने तेलंगणाच्या चौथ्या मानांकित शौर्य समालाचा 6-2, 6-4 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. महाराष्ट्राच्या अमोघ दामले याने पाचव्या मानांकित मध्यप्रदेशच्या रुद्र बाथमचा 6-2, 7-5असा पराभव करून मुलींच्या गटात कर्नाटकच्या दिशा बेहेरा हिने सहाव्या मानांकित गुजरातच्या प्राची राणाचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल – एकेरी गट – मुख्य ड्रॉ (दुसरी फेरी) – मुले – अर्णव पापरकर (महाराष्ट्र)(1) वि. वि. शौर्य शर्मा (केरळ)6-0, 6-0; मनन अगरवाल (महाराष्ट्र) वि. वि. ओम वर्मा (महाराष्ट्र)6-3, 6-1; तनुष घडियाल (कर्नाटक)(3) वि. वि. तेज ओक (महाराष्ट्र)7-5, 6-4; ऋषिकेश रामनाथन (महाराष्ट्र) वि. वि. शौर्य समाला (तेलंगणा)(4)6-2, 6-4; अमोघ दामले (महाराष्ट्र) वि. वि. रुद्र बाथम (मध्यप्रदेश)(5)6-2, 7-5; समर्थ संहिता (महाराष्ट्र)(2)वि. वि. अमन शहा (महाराष्ट्र) 6-1, 6-2; मुली – दिव्या अंगरीश (दिल्ली)(1) वि. वि. सहाना कमलाकानन (तामिळनाडू) 6-0, 6-2; दिशा बेहेरा (कर्नाटक) वि. वि. प्राची राणा (गुजरात)6-3, 6-2; सिया प्रसादे (महाराष्ट्र)वि. वि. पार्थसारथी मुंडे (महाराष्ट्र)6-1, 6-0; प्रिंसी मांडगलला (तेलंगणा) वि. वि. सई वाराणसी (तेलंगणा) 6-3, 6-2; अनुष्का (महाराष्ट्र)(8) वि. वि. सेरेना रॉड्रिक्स (महाराष्ट्र) 6-4, 6-1.