पुणे (वृत्तसंस्था ) ;- शहरात आणि ग्रामीण भागात रुग्णसंख्या कमी होऊन देखील शहराला कोणताही दिलासा मिळालेला नाही. पुणे शहरात विकेंड लॉकडाऊन आहे तसाच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उपस्थिती आज कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे शहर तसेच ग्रामीण भागात संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शहरात विकेंड लॉकडाऊन रद्द होईल तर ग्रामीण भागात अत्यावश्यक वगळता इतर सेवा सुरु होतील अशी अपेक्षा होती.
पण आज कोणताही दिलासा देण्यात आला नाही. सर्व बंधनं आहेत तशीच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याबरोबरच गर्दी होणाऱ्या सर्व ठिकाणी चाचण्या वाढण्याचा देखील निर्णय घेण्यात आला. आता नवीन नियमानुसार दुकानदारांची तसेच कर्मचाऱ्यांची दर पंधरा दिवसांनी चाचणी करण्यात येणार आहे.