उद्योजक अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते होणार उदघाटन
जळगाव (प्रतिनिधी) : सरस्वती फोर्ड, सरस्वती एम.जी., सरस्वती डेअरी व सरस्वती ग्रुपच्या संचालिका पूजा धवल टेकवाणी यांनी स्वतः अत्यंत सृजनात्मक पद्धतीने काढलेले,पोर्ट्रेट, स्टील लाईफ, टेक्सचर, विविध प्रकारचे डोळयांचे पारणें फेडणारे, विविध विषयावर आधारित, अतिशय सुंदर, पेंटिंगचे प्रदर्शन आज १ मार्च ते १५ मार्चपर्यंत पी. एन. गाडगीळ प्रदर्शन सभागृह, रिंगरोड येथे घेण्यात येत आहे. या प्रदर्शनीचे उदघाटन शनिवार १ मार्च सायंकाळी ५ वाजता उद्योजक
अशोक जैन, चेअरमन, जैन इरिगेशन, जळगाव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
जळगावमध्ये आयोजित या आगळ्या-वेगळ्या,बहुरंगी, कलात्मक, प्रदर्शनीचा लाभ जळगांव जिल्ह्यीतील महिला, विद्यार्थी,युवक, युवती व कलाप्रेमीनी मोठया संख्येने उपस्थित राहून घेण्याचे आवाहन आयोजक पूजा धवल टेकवानी यांनी केलेले आहे.