जळगाव शहरात छत्रपती शिवाजीनगर येथे रात्री घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील छत्रपती शिवाजीनगर येथे शनिवारी मध्यरात्री भरधाव बुलेटस्वारकाने शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या प्रौढाला मागून जोरात धडक देत त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरला होता. याप्रकरणी शहर पोलिसांनी तपास करून सदर तरुणाला ताब्यात घेत अटक केली आहे. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
सिकंदर दिलावर पठाण उर्फ बादशहा (वय ५१ वर्ष रा. छ. शिवाजीनगर, जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. त्यांचा मुलगा सुलेमान सिकंदर पठाण (वय २७, रा. हरीविठ्ठल नगर परिसर, जळगाव) याने शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यानुसार बेफाम व निष्काळजीपणाने बुलेट चालवणाऱ्या लिबिनो मोहन वर्गीस (वय १९, रा. महावीर नगर, जळगाव) या तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याची बुलेट (एमएच १९ इएन ६७८०) देखील जप्त करण्यात आली आहे. दरम्यान अपघातांच्या घटनांमुळे जळगाव शहर हादरून गेले आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र शिखरे हे करीत आहेत.