याप्रकरणात संशयित आरोपी दिपक कृष्णकुमार सिंग (वय-५० रा. वरणगाव फॅक्टरी) याला अटक करण्यात आली होती. त्याला सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मंगळवारी १७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वरणगाव येथील सिध्देश्वर नगरात प्रमोद ज्ञानेश्वर महाजन (वय-४८ ) हे प्रौढ व्यक्ती आपल्या परिवारासह वास्तव्याला होते.
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात नोकरीला होते. रविवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास वरणगाव फॅक्टरी आवारातील सुशील नगर सर्कल जवळ त्याचा मित्र दिपक कृष्णकुमार सिंग (वय-५० रा. वरणगाव फॅक्टरी) याच्या सोबत वडापाव खात बसले होते. या दोघांमध्ये गप्पा मारत असतांना वाद झाला. त्यानंतर दिपकसिंगने डोक्यात लाकडी दांडा मारून त्यांचा खून केला होता. याबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ करीत आहे.