जळगाव शहरातील राजमालती नगरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील राजमालती नगरात राहणाऱ्या ४८ वर्षीय प्रौढ व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ९ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गजानन आत्माराम निसळकर (वय ४८ रा. राजमालती नगर, जळगाव) असे मयत प्रौढ व्यक्तीचे नाव आहे. गजानन निसळकर हे परिवारासह वास्तव्याला होते. मंगळवारी दि. ९ एप्रिल रोजी सायंकाळी घरी कुणी नव्हते. त्यावेळी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. हा प्रकार रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीला आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रविंद्र सोनार यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला.
मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. बुधवारी १० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता मृतदेहावर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र सोनार हे करीत आहे.