अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मंगरूळ येथील एका प्रौढाने खिडकीला दोर बांधत गळफास घेतला. मृत्यूचे कारण समजू शकले नाही. पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील मंगरूळ येथील शरद रघुनाथ पाटील (वय ५८) यांनी दि. २७ रोजी गावातील सेंट मेरी शाळेसमोरील अजय केले यांच्या गोदामच्या खिडकीला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.लक्ष्मण शंकर पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे पुढील तपास करीत आहेत.