अमळनेर शहरातील क्रीडा संकुलाजवळ घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- प्रेयसीने विवाह करण्यास नकार दिल्याने आलेल्या नैराश्यातून तालुक्यातील गांधली येथील तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील क्रीडा संकुलाच्या शेजारी डुबक्या मारोती रस्त्यावर बुधवारी सकाळी १२ वाजेच्या सुमारास घडली.याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गौरव रवींद्र बोरसे (वय २१, रा. गांधली ता. अमळनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे. तरुणाने दि. ६ रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास रस्त्यालगत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गौरवने इन्स्ट्राग्रामवर टाकलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे.(केसीएन)व्हिडिओत, गौरवने त्याच्या आईला विनवणी केली आहे की, आई तू माझ्या जाण्यानंतर रडू नको, मी तुझी इच्छा पूर्ण करू शकलो नाही. माझे वडील माझ्यावर पैसे खर्च करायला नाही म्हणायचे. बाप्याला शिकव, मित्रांना आवाहन करताना त्याने सांगितले की मित्रांनो प्रेम करू नका. आपापल्या अभ्यासात लक्ष ठेवा, मी एका मुलीवर प्रेम केले तिने मला नकार दिला, ती विसरून गेली माझे खरे प्रेम आहे मी जीवन संपवत आहे. मी आई वडिलांना सोडून जायला नको, मी जी चूक करत आहे ती तुम्ही करू नका, असे व्हिडिओत म्हट्ले आहे.
वय पूर्ण झाल्यावर गौरवने त्याच्या प्रेयसीला आता आपण लग्न करू असे सांगितले. मात्र तिने स्पष्ट नकार देऊन मी तुला विसरली असे सांगितल्याने त्यांचे वाद झाले आणि थोड्या वेळानंतर त्याने इन्स्ट्राग्राम वर व्हिडीओ टाकला. नंतर झाडाला गळफास घेतला. घटनस्थळी अमळनेर पोलीस स्टेशनचे सहाययक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल विनोद भोई, हेडकॉन्स्टेबल मिलिंद बोरसे, विनोद संदानशिव यांनी भेट देऊन पंचनामा केला. गौरवचे शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात नेले. भूषण हेमराज सूर्यवंशी याने खबर दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.