जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथील एक 19 ते 21 वयोगटातील तरुण-तरुणी बेपत्ता झाल्याची माहिती असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला कुठली ही नोंद नाही.
शिरसोली गावात एका भागातील हे तरुण व तरुणी रहिवासी आहेत. तरुण बाहेर जाऊन येतो असे सांगून घरातून निघून गेला आहे. तर त्याच तरुणांच्या घरा जवळ असलेली तरुणीदेखील बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच एकच चर्चा सुरू झाली यावेळी दोघांचे कुटुंबातील लोक शोधा शोध करत आहे. पण संध्याकाळ झाली तरी तरुण तरुणी घरी न आल्याने नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये नोंद करण्यासाठी गेले असल्याचे कळते पण नोद न करता ते घरी परत आले असल्याचे कळते दोघं ही कुटुंब दोघांचा शोध घेत आहेत. पण तरुण व तरुणी है वयात असल्याने घरच्या कुटुंबातील लोकांची डोके डुकी ठरली आहे. आता याप्रकरणी पोलीसांत नोद होणार का?हे पाहाणे गरजेचे आहे.