जळगाव (प्रतिनिधी)- स्वामी विवेकानंदांचे जाज्ज्वल्य देशप्रेम कोविड काळातही युवकांना दिपस्तंभासमान दिशादर्शक आहे. असे प्रतिपादन निसर्ग मित्र समितीचे धुळे जिल्हा प्रवक्ते प्रा. डॉ . प्रविणसिंह गिरासे यांनी केले.
वलवाडी स्थीत निसर्ग मित्र समिती कार्यालयात दि. ११ सप्टेंबर रोजी झालेल्या कोरोना योद्धा सन्मान प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ .गिरासे बोलत होते. प्रमुख अतिथी समितीचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष आर.आर.सोनवणे, सुनील कापडणीस, जळगावच्या कविवर्य नीळकंठ महाजन स्मृती प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष विजय लुल्हे, वृक्षमित्र शशिकांत शिंदे (सटाणा) आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे यांनी कार्यविस्तार सादर केला. त्यानंतर विजय लुल्हे यांनी मनोगत व्यक्त केले.
जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांच्या कार्याची विशेष दखल घेऊन निसर्ग मित्र समिती धुळेतर्फे कोरोना योद्धा सन्मानपत्र सामितीचे प्रवक्ते प्रा. डॉ .प्रविणसिंह गिरासे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आले. या प्रसंगी निसर्ग मित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे यांनी नाले यांना वृक्षदान करीत संस्थेने महिलादिना निमित्ताने प्रकाशित केलेला विशेषांक, शिवरायांचे आज्ञापत्र देऊन कार्याला शुभेच्छा दिल्या . सत्कारार्थी पंकज नाले यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन निसर्ग अहिरे यांनी केले .