कजगाव ता भडगाव(प्रतिनिधी ) – येथुन जवळच असलेल्या घुसर्डी ता भडगाव येथील भूमिपुत्र व पोलीस दलात कार्यरत असलेले प्रविण उत्तमराव शिंदे यांची पोलीस निरीक्षक ह्या पदावर पदोन्नती झाली आहे घुसर्डी सारख्या अगदी छोट्याश्या खेड्यातून त्यांनी कठोर मेहनत घेऊन पोलीस निरीक्षक पदावर मजल मारल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे त्यांनी यापुर्वी चाळीसगाव शेगाव औरंगाबाद भुसावळ नाशिक येथे सेवा बजावली आहे व आता पदोन्नतीवर त्यांची नियुक्ती अकोला येथे झाली आहे पोलीस निरीक्षक प्रवीण शिंदे यांच्यावर सर्वत्र अभिनंदन होत आहे ते माजी मुख्याध्यापक उत्तमराव शिंद यांचे सुपुत्र तर विलास व अनमोल शिंदे यांचे बंधू आहेत