महाराष्ट्र संघाला उपविजेतेपद
जळगाव (प्रतिनिधी ) – भारतातील सर्वात प्रथम 12 वर्षा आतिल लहान मुलांच्या ग्रासरूट हॉकी स्पर्धेत जळगाव मधील गोदावरी इंग्लिश मीडियम CBSE स्कूल जळगाव चे दोन विद्यार्थीची निवड महाराष्ट्र संघात झाली होती, कार्तिक विनोद विसपुते, जयेश रवि संगेले, कार्तिक ची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती.
भरतातून पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश कश्मीर तेलंगाना कोलकाता राजस्थान महाराष्ट्र हैदराबाद बिहार 16 राज्यतुन संघ आले होते सदर स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उपविजेतेपद संपादन केले. सहारनपुर उत्तर प्रदेश विजय झाले तर महाराष्ट्र संघाने उपविजेतेपद संपादन केले. बक्षीस वितरण साठी भारताचे महान हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांचे चिरंजीव ओलंपियन श्री अशोक कुमार ध्यानचंद यांच्या हस्ते लहान मुलांना ट्रॉफी व मेडल देऊन सत्कार करण्यात आले. गोदावरी शाळेच्या खेळाडूंच्या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, गोदावरी शाळेच्या प्राचार्या सौ नीलिमा चौधरी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. हॉकी खेळाडूंना प्रा.आसिफ खान व सत्यनारायण पवार यांचे मार्गदर्शन लाभले.