पाचोरा-भडगाव मतदारसंघात चुरस वाढली
भडगाव (प्रतिनिधी) :- ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ ची पाचोरा-भडगाव विधानसभेची उमेदवारी प्रताप हरी पाटील यांना जाहीर करण्यात आली असून, त्यांना निवडणूकीचा एबी फॉर्म देण्यात आला. यामुळे पाचोरा भडगाव मतदारसंघात चुरस वाढली असून मतांची मोठ्या प्रमाणात विभागणी होणार आहे.
प्रताप हरी पाटील यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षात संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच प्रचारासाठी स्वतः संभाजीराजे छत्रपती हे मतदारसंघात प्रचाराला येतील अशी माहिती देण्यात आली आहे. पक्षप्रवेशावेळी पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, डॉ.पूनम पाटील, गणेश सोनवणे, चेतन पाटील, प्रतिक पाटील उपस्थित होते.