जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांचे वतीने जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, सामान्य रुग्णालय, जळगाव यांचेमार्फत आंतरराष्ट्रीय युवा दिन २०२४ च्या निमिताने इ. ८ वी, ९ वी व ११ वी च्या वर्गात शिकणाऱ्या विद्याथी-विद्याथीनीसाठी जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२४ चे आयोजन शासकीय नर्सिंग महाविद्यालय, सामान्य रुग्णालय जळगाव येथे करण्यात आले होते. स्पर्धेत सेजल शेख या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांचे मार्फत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात आली होती. त्यामध्ये ३० स्पर्धकांनी (विविध शाळातील) नोंदणी केली होती.(केजीएन) सदर स्पर्धेस विविध शाळातील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. स्पर्धेचे सुरुवातीला जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर यांनी जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२४ बाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर स्पर्धकाच्या मोबाईलवर राज्य स्तरावरून आलेली स्पर्धेची लिंक पाठविण्यात आली. त्यानंतर ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२४ ची सुरुवात करण्यात आली. सदर जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.
निकालात सेजल झाकीर शेख या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवला. सदर प्रथम क्रमांकास प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास सहभाग घेतलेबाबत प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कार्यालयातील जिल्हा सहाय्यक कार्यक्रम गिरीश गडे, जिल्हा सहाय्यक लेखा मोहंजझिम खान, प्रल्हाद सोनावणे यांनी परिश्रम घेतले.