जळगाव शहरातील अयोध्या नगर येथील घटना ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : येथील एमआयडीसी परिसरातील अयोध्या नगर येथे पत्नीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या फरार पतीला पोलिसांनी शिताफीने जामनेर रस्त्यावरील बोदवड येथून अटक केली आहे.

कोमल अजय चव्हाण (वय ३२, रा. आयोध्या नगर) असे जखमी विवाहितेचे नाव आहे. तिचा पती अजय राजमल चव्हाण (वय ३५, रा. घाणेगाव तांडा ता. सोयगाव) हा विवाहबाह्य संबंध ठेवतो या कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाले होते. (केसीएन)या वादातून दि. ४ जुलै रोजी त्याने त्याच्या पत्नीला लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करून जबर जखमी केले होते. या प्राणघातक हल्ल्यात पत्नी कोमल चव्हाण या गंभीर जखमी झाल्या होत्या.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणी एमआयडीसी पोलीस पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळालेल्या माहितीवरून रविवारी दि. २८ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जामनेर शहरातील बोदवड रस्त्यावरून संशयित आरोपी अजय राजमल चव्हाण याला अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई निरीक्षक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश गोसावी, रवींद्र चौधरी, नाईक विकास सातदिवे, राहुल पाटील, नितीन ठाकूर, जामनेर पोलीस स्टेशनचे लहासे आदींनी केली आहे.









