अहमदनगर (वृत्तसंस्था) – माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या प्रवेशानंतर अहमदनगर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत, असा गौप्यस्फोट राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला. तनपुरेंच्या गौप्यस्फोटाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास कोण-कोण उत्सुक आहेत त्यांचे नावे वेळ आल्यावर मी नक्की सांगेन, असंही तनपुरे म्हणाले आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यातून राष्ट्रवादीत कोण कोण प्रवेश करणार याचे आडाखे बांधायला सुरुवात झाली आहे. तसंच जे नाराज नेते आहेत त्यांची राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची इच्छा आहे, असा दावा मंत्री तनपुरे यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना त्यांनी सांगितले.