काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांची माहिती
जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची सत्ता महाविकास आघाडीला देताना तिन्ही पक्षांना प्रत्येकी २० महिने अध्यक्षपद मिळावे असा सुरुवातीचा प्रस्ताव राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खंडसे यांना मान्य नव्हता आज सविस्तर चर्चा होऊन सर्वांच्या सहमतीने आजचा निर्णय घेतला गेला असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी सांगितले .
महाविकास आघाडीच्या कोअर कमिटीतील काँग्रेसच्या भूमिकेबद्दल बोलताना जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार पुढे म्हणाले की , शिवसेनेच्या वतीने काँग्रेस पक्षाशी या मुद्द्यावर चर्चा झाल्यांनतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रस्तावाचे सूतोवाचही केले होते . मात्र त्या बैठकीत आपण सहभागी नव्हतो असे सांगत नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी हा प्रत्येकी २० महिने तिन्ही पशांना अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव मान्य नसल्याची भूमिका घेतली होती . आमचा या प्रस्तावावर स्वाभाविक जोर होता आजही बैठकीत आम्ही किमान १ वर्ष काँग्रेसकडे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद असावे असा विचार मांडला होता मात्र त्यावरही मतभेद होताना दिसले . त्यामुळे शिवसेनेनंतर दुसऱ्या टप्प्यात मिळणाऱ्या उपाध्यक्षपदाला आम्ही मान्यता दिली. आणि आम्ही या निर्णयावर समाधानी आहोत . काँग्रेसला १ वर्ष अध्यक्षपद मिळाले असते, तर आम्ही जास्त समाधानी राहिलो असतो . आघाडीत बिघाडी नको म्हणून आम्ही सगळ्यांनी सामंजस्याची भूमिका घेत हा निर्णय मान्य केला . आमच्या संचालकांची ३ ही संख्या पाहता उपाध्यक्षपदावर आम्ही समाधानी आहोत . आधी आमच्या पक्षाचा फक्त १ संचालक होता आता ३ आहेत . आम्हाला हळूहळू पुढे जावे लागणार आहे , असेही ते म्हणाले .