अमळनेर( प्रतिनिधी) – येथील खान्देश शिक्षण मंडळ संचालित स्व. श्री. पंढरीनाथ छगन शेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी. फार्मसी महाविद्यालयात कार्यरत प्राचार्य श्री. रविंद्र गंगाराम माळी यांची वर्ल्ड जर्नल ऑफ फार्मसी अँड मेडीकल रीसर्च या शास्त्रीय जर्नलच्या संपादकीय सलाह्गार मंडळात सदस्य म्हणून निवड झाली. प्रा. माळी हे मागील २३ वर्षांपासून फार्मसी या क्षेत्रात अध्यापनात कार्यरत आहेत. आजतागायत त्यांची दोन पुस्तके, तीन पुस्तकांमध्ये लेख, तसेच संशोधन पर २२ राष्ट्रीय व ४ आंतरराष्ट्रीय पेपर आणि शास्त्रीय माहितीपर ६ राष्ट्रीय व ४ आंतरराष्ट्रीय पेपर नामांकित जर्नल्स मध्ये प्रकाशित झाली आहेत. फार्मसी क्षेत्रातील अजून २ शास्त्रीय जर्नलच्या संपादकीय मंडळात हि त्यांचा सहभाग आहे.
त्यांच्या या निवडी बद्दल खा. शि. मंडळाचे कार्याध्यक्ष जितेंद्र जैन, उपाध्यक्ष कल्याण पाटील, फार्मसी महाविद्यालयाचे चेअरमन सी.ए.नीरज अग्रवाल, खा. शि मंडळ सदस्य डॉ. बी. एस. पाटील, हरी भिका वाणी, डॉ. संदेश गुजराथी, योगेश मुंदडे, प्रदीप अग्रवाल, चिटणीस डॉ. ए. बी जैन, सर्व सहकारी प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
त्याच प्रमाणे फार्मसी महाविद्यालयास ज्यांच्या स्वर्गीय वडिलांचे नाव देण्यात आले, ते प्रा. शरदचंद्रजी भांडारकर, क्षत्रिय कांच माळी समाजाचे अध्यक्ष श्री. मनोहर महाजन सर, उपाध्यक्ष, कार्यकारिणी पंच मंडळ सदस्य, समाज बांधव, वैद्यकीय तथा मेडीकल क्षेत्रातील व इतर सर्व मित्र मंडळीनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.








