जालना ( प्रतिनिधी ) – भोकरदन तालुक्यातील तडेगाव येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी प्रभाकर गोफने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .

भोकरदन तालुक्यातील तडेगाव येथे जिल्हा परिषद शाळेचे मुख्यध्यापक महाजन यांनी शालेय समिती स्थापन करण्यासाठी सर्व गावकऱ्याची बैठक घेतली गावकऱ्यानी शालेय व्यवस्थापन समिती बिनविरोध स्थापन करण्याचे ठरवले. सर्वांच्या संमतीने अध्यक्षपदी प्रभाकर गोफने यांची बिनविरोध निवड करण्यात आली . यावेळी तडेगावचे सरपंच राजुसींग बमणांवत , उपसरपंच वसीम शेख , ग्रामपंचायत सदस्य सुरेश लव्हते , प्रदीप साळवे , माजी सरपंच मधुकर मुंगटराव , सलीम शेख , अमोल साळवे , साहेबराव लोणकर , भाऊराव साळवे , आशु शेख , दिलीप देशमुख , गणेश देशमुख , पांडू नऱ्हे , अरुण लव्हते आदी उपस्थित होते.







