आ. राजूमामा भोळेंच्या उपस्थितीत दिले पत्र
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग १३ ब मध्ये अपक्ष उमेदवार प्रियांका विनोद तायडे यांनी भाजपाचे उमेदवार सुरेखा नितीन तायडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी आ.राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत दिले आहे.

सुरेखा तायडे यांचा सामाजिक कार्याचा अनुभव, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी असलेली तत्परता, सर्वांगीण विकासाबाबतची सकारात्मक दृष्टी लक्षात घेऊन हा पाठिंबा देत असल्याचे पत्रात म्हटले आहे. यावेळी १३ अ चे उमेदवार नितीन सपके, विनोद तायडे, विशाल देवकर, अजित राणे आदी उपस्थित होते.









