जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथे घडली होती घटना
माजविणाऱ्या व प्रतिबंध करण्यासाठी गेलेल्या पोलीसांवर हल्ला करणाऱ्या एका तरुणास पोलीसांनी जेरबंद केलेले आहे.
शेंगोळा गांव येथील पोलीस स्टेशन हद्दीत येते. दि. २८ नोव्हेबर दुपारच्या सुमारास गांवातील दिलावर समशेर तडवी (वय-३२) हा तरुण हातात कुकरी हत्यार घेऊन दहशत माजवित असतांना येथील पोलीसांनी त्यास प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला असता कर्तव्यावर असणारे फिर्यादी पो. कॉ. सोपान गणपत गायकवाड यांना संशयित आरोपी दिलावर तडवी यांने धक्काबुक्की करून मारहाण करत दुखापत केली.
संशयित आरोपी दिलावर तडवी यांच्या विरुद्ध पो. कॉ. सोपान गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास येथील सहा.पो. नि. स्वप्नील शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो. उप निरिक्षक रियाज शेख व पोलीस कर्मचारी करीत आहे.