अमळनेर तालुक्यातील देवगाव देवळी येथे कारवाई
अमळनेर (प्रतिनिधी) :- पोलिसांनी देवगाव देवळी येथे धाड टाकून सुमारे ७५ हजाराची गावठी दारू नष्ट केली आहे. अमळनेर पोलीस स्टेशनकडून तिघांचा शोध सुरू आहे.
तालुक्यातील देवगाव देवळी येथे नाल्याच्या काठावर झाडाझुडुपांमध्ये काही लोक दारूची हातभट्टी चालवत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास देवरे याना २१ रोजी सकाळी मिळाली. देवरे यांनी पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, मोनिका पाटील, नाना पवार, योगेश सोनवणे, उदय बोरसे याना दारू भट्ट्यांवर छापे मारण्यासाठी रवाना केले.
सकाळी आठ वाजेच्या सुमारास नाल्याच्या काठावर झुडुपात चंद्रकांत नगराज भिल (वय ४०) हा प्लास्टिक ड्रम मध्ये काठीने दारू ढवळताना दिसून आला. पोलिसांना पाहताच तो पळून गेला. त्याठिकाणी २५ हजार रुपये किमतीचे गुळ व नवसागर मिश्रित ५०० लिटर कच्चे रसायन चार ड्रम मध्ये आढळून आले. पोलिसांनी नमुना काढून सर्व रसायन नष्ट केले. त्यानंतर लगेच पोलिसांनी लागोपाठ आणखी दोन ठिकाणी धाड टाकली.
त्यांना सखाराम लालचंद भिल (वय ५०) याच्या हातभट्टीवर धाड टाकली. तेथे ३० हजार रुपये किमतीचे ६०० लिटर कच्चे रसायन, तर छगन जमाराव भिल (वय ५०) याच्या हातभट्टीवर २० हजार रुपये किमतीचे ४००लिटर कच्चे रसायन आढळून आले. पोलिसांनी तिन्ही हातभट्ट्या उध्वस्त केल्या आहेत. तिन्ही संशयित आरोपी फरार झाले आहेत. तिन्ही गुन्हयात हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील, हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील तपास करीत आहेत.