बोदवड ( प्रतिनिधी ) – जुन्या वादाच्या कारणावरून थेट पोलीस ठाण्याच्या आवारातच गोंधळ घालून एकमेकांना शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही घटना ६ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बोदवड पोलीस ठाण्याच्या आवारात घडली. आनंदा दामू बावस्कर, विकास आनंदा बावस्कर आणि निवृत्ती किसन वाघ (सर्व रा. येवती, ता. बोदवड) यांनी जुन्या वादातून पोलीस ठाण्यात येऊन आरडाओरड, शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४(२), २२१, २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बोदवड पोलीस करीत आहेत.








