पोलीस अधीक्षकांनी काढले शनिवारी उशिरा आदेश
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा पोलीस प्रशासनातील पोलीस कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया नुकतीच पार पडली. बदल्यांमध्ये जळगाव स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) जिल्ह्यातील २८ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी रात्री उशिरा आदेश काढले आहेत.
गेल्या ३ वर्षापासून एलसीबीच्या सर्वसाधारण बदल्या झाल्या नव्हत्या. नुकतेच झालेल्या बदल्यांमध्ये एलसीबीच्या देखील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. तीन वर्षापूर्वी कोविड काळानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी एलसीबीमध्ये नियुक्तीसाठी काही निकष ठरवले होते.
एलसीबीत नवीन येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये रविंद्र अभिमन पाटील – धरणगाव येथून, प्रदिप सपकाळे – रावेर येथून, मुरलीधर धनगर – पो.मु. जळगाव, निलेश सोनवणे – चोपडा शहर, किशोर राजाराम पाटील – एमआयडीसी, संदीप चव्हाण – उपविपोअ. कार्या भुसावळ, गोपाळ गवारे – भुसावळ बाजारपेठ, शातांराम पवार – चाळीसगाव ग्रामीण, भुषण शेलार – चाळीसगाव शहर, राहुल कोळी – एरंडोल, विलास गायकवाड – उपविपोअ. कार्या, अमळनेर, जितेंद्र पाटील – पिपंळगाव हरे, संजय सुर्यवंशी – धरणगाव, रविंद्र चौधरी – मुक्ताईनगर, हिरालाल पाटील – भुसावळ तालुका, अतुल रघुनाथ वंजारी – एमआयडीसी, सुनिल सैंदाणे – सावदा, विनोद संभाजी पाटील – पो.मु. जळगाव, दिपक माळी – धरणगाव, रविंद्र कापडणे – जिवीशा, सचिन पोळ – भुसावळ बाजारपेठ, प्रविण पुडंलिक भालेराव – पो.मु. जळगाव, प्रदीप चवरे – पो.मु. जळगाव, विष्णु अर्जुन बिऱ्हाडे – पो.मु. जळगाव, यशवंत टहाकळे – सावदा, मनोज सुरवाडे – पो.मु. जळगाव, गजानन देशमुख – नशिराबाद, विजय दमोदर पाटील – शनिपेठ यांची एलसीबीत नियुक्ती करण्यात आली आहे.