चाळीसगाव ग्रामीण पोलिसांचा तपास

चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील जामडी येथील गैबनशहा बाबा दर्गावर दि. ८ रोजी दुपारी एका फकीर तरुणाचा धारदार हत्याराने खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी ४ संशयितांवर गुन्हा दाखल केला असून त्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे.
गयबन शहा बाबा दर्गा, जामडी या ठिकाणी फिर्यादी अजमल शहा याकूब शहा यांचा लहान भाऊ तबरेज शहा याकुब शहा (वय २६ वर्षे) याची गुरुवारी हत्या झाली. त्यांचे गावातील अल्पवयीन संशयित आरोपीच्या बहिणीने सन २०१९ मध्ये आत्महत्या केली होती. हि आत्महत्या मयत तबरेज याच्यामुळे झाली असल्याचा संशय अल्पवयीन मुलाला होता. त्याचा राग त्याच्या डोक्यात होता.
त्यामुळे गुरुवारी या रागातून तबरेज शहा याकुब शहा याचे पाठीवर या अल्पवयीन संशयिताने धारदार चाकुने वार करुन त्याचा खुन केल्याची फिर्याद चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात दाखल झाली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहा. पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख करीत आहे.









