एसपी डॉ. महेश्वर रेड्डींचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव पोलिस दलातील ५ सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे आदेश पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहेत.

वाहतुक शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांची नशिराबाद पोलिस स्टेशनला प्रभारीपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या जागी निंभोरा पोलिस स्टेशनचे स.पो.नि. हरीदास बोचरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. निंभोरा पोलिस स्टेशनला स.पो.नि. बोचरे यांच्या जागी रावेर येथील स.पो.नि. मिरा देशमुख यांची नेमणूक करण्यात आली आहे. कासोदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक निलेश राजपूत यांची पोलिस अधीक्षक कार्यालयात रीडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. निलेश राजपूत यांच्या जागी रीडर श्रीकांत पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.









