जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव पोलीस दलातील १२ अधिकारी-अंमलदारांना महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक बोधचिन्ह तथा सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. त्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांसह पोलिस अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
पोलीस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल, प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक, शौर्य पदक जाहीर झाले. तसेच, पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस महासंचालकांचे बोधचिन्ह, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र सन-२०२२ वर्षाकरिता पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी जाहीर केले व बोधचिन्ह, सन्मानचिन्ह व प्रशस्थीपत्र प्राप्त प्रदान झालेल्या अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनीही पोलीस महासंचालकांचे बोधचिन्ह्, सन्मानचिन्ह व प्रशस्थीपत्र प्राप्त प्रदान झालेल्या अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
सन्मानचिन्ह व बोधचिन्ह प्राप्त झालेल्या अधिकाऱ्यांचे जिल्ह्यात कौतुक होत आहे. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक विनयकुमार भीमराव देसले, सहा.पोलीस उप निरीक्षक, संजय हरिदास पवार, सहा. पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र हिरालाल प्रभाकर चौधरी, पो. हवा. सुनील माधव शिरसाठ, पो. हवा. रवींद्र धोंडू घुगे, पो. ना. विजय अशोक दुसाने, पो. ना. अल्ताफ सत्तार मन्सुरी, पो. ना. अमोल भारत विसपुते यांचा समावेश आहे.