जळगाव (प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या गृह विभागाने बुधवारी 30 रोजी रात्री उशिरा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. यात नंदुरबार येथील एएसपी चंद्रकांत वामन गवळी हे जळगावचे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून येणार आहेत.

जळगावचे अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांची पुणे शहर आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाली आहे. नंदुरबारचे अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी हे दोन दिवसात पदभार घेण्याची शक्यता आहे. एसपी डॉ. प्रवीण मुंढे याप्रमाणे आता अप्पर पोलिस अधीक्षक देखील नवीन येणार आहेंत.
अमळनेरचे नवीन उपविभागीय पोलीस अधीक्षक म्हणून राकेश साहेबराव जाधव हे मुंबई येथील गुप्तवार्ता विभागातुन येताहेत. तेथील डीवायएसपी कुमार चिंथा यांची अमरावती येथे बदली तर भुसावळ विभागातील डीवायएसपी गजानन राठोड यांचीदेखील बदली झाली असून त्यांना ते नवी मुंबई येथे सहाययक पोलीस आयुक्त म्हणून जात आहेत.







