रावेर तालुक्यातील सुकी नदीजवळ भीषण अपघात
रावेर प्र(प्रतिनिधी) :- तालुक्यातील ब-हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील वडगावच्या पुढे सुकी नदीजवळ दि. ११ रोजी ७ वाजेच्या सुमारास रावेरकडून भरधाव वेगाने येणारी ट्रक क्रमांक (एम. एच. १८ बीजी ९४२१) यांनी वाघोदाकडून येणारी मोटारसायकल क्रमांक (एम एच १९ डि ई ७२१०) यांना जोरदार धडक दिल्याने मोटार सायकल चालक शेख हाजीद शेख सादीक (वय ५०) हे जागीच ठार झाल्याची घटना घडली.
वाघोदा येथील रहिवाशी शेख हाजीद शेख साजिद हे वाघोदा येथून विवरा येथे लग्नाच्या काही कामानिमित्त येत होते. समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिल्याने शेख साजिद हे ठार झाले. दोन दिवसानंतर मुलाचे लग्न होणार होते. या घटनेने वाघोदा व विवरा गावामध्ये शोकाकळा पसरली आहे. घटनास्थळी सावदा पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक विशाल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून मयतला रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच विवरा, वाघोदा, चिनावल येथून नागरिकांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्यात आली आहे.