एमआयडीसी पोलिसांचा तपास
जळगाव (प्रतिनिधी) : एमआयडीसी येथील हाफकिन कंपनीतील चोरीचा माल विकत घेणाऱ्या भंगार विक्रेत्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत ३ संशयित आरोपी अटक करण्यात आले आहे. भंगार विक्रेत्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
औद्योगिक वसाहतीमधील हाफकिन अजिंठा फार्मास्युटिकल्स कंपनीतून ६३ हजार रुपयांची १७ किलो तांब्याच्या धातूची पाइपलाइन चोरून नेल्याची घटना दिनांक १९ ते २१ जुलैदरम्यान झाली होती. एमआयडीसी पोलिस ठाण्यात रविवारी दि. २१ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक व्यवस्थापक तुषार चौधरी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास केला. तपासातून ज्ञानेश्वर सोनार याने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून ज्ञानेश्वर रतन सोनार (२५, रा. मेहरुण) व विनोद गोपाळ मोरे (वय २२) यांना एमआयडीसी पोलिसानी अटक केली होती.
त्याच्याकडुन चौकशी करता त्यांनी सदर चोरीस केलेला कस्तुरी हॉटेलच्या मागे, रामनगर येथे असलेल्या भंगार व्यवसायीक दुकानादार शेख सईद रफीक शहा, (वय ५३ वर्षे, रा. रजाकॉलनी, मास्टर कॉलनी, जळगाव) यास विकला असल्याबाबतचे सांगितले. त्यास सदरचा माल हा चोरीचा असुन देखील त्यांने खरेदी केल्याने चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले होते. बुधवारी दि. २४ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायमुर्ती मोरे यांनी न्यायालयीन कोठडी दिली आहे.
सदर कारवाई ही पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधिक्षक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक दत्तात्रय निकम, पोउनि/दिपक जगदाळे, पोहेकॉ सचिन मुंढे, पोहेकॉ / रामकृष्ण पाटील, गणेश ठाकरे, सिध्देश्वर डापकर, साईनाथ मुंढे, ललीत नारखेडे, किरण पाटील, छगन तायडे अशांनी केली आहे.