पाचोरा-भडगाव कृषि उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांसाठी खुशखबर
पाचोरा (प्रतिनिधी) : नवीन खरीप हंगाम सुरु झालेला असून संभाव्य नैसर्गिक आपत्तीचे धोके पाहता शेतकऱ्यांनी कृषि मालाचा पिक विमा उतरवणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत शासनाची कृषि पिकांसाठी एक रुपयात पिक विमा योजना सुरु झालेली आहे. सदर योजनेमार्फत शेतकऱ्यांना पिक विमा उतरवणे सुलभ व्हावे यासाठी “कृषि उत्पन्न बाजार समिती, पाचोरा-भडगाव”तर्फे मुख्य कार्यालय पाचोरा येथे सन-२०२४-२५ चा खरीप हंगामातील पिकांसाठी पिक विमा भरणा सुविधा केंद्र निशुल्क दरात बाजार समिती मार्फत १ जुलै-२०२४ पासून सुरु करण्यात येणार आहेत.
पिक विमा भरण्यासाठी अंतिम मुदत १५ जुलै-२०२४ पर्यंत आहे. पिक विमा भरण्यासाठी पिक पेरा असलेला ७/१२ उतारा, ८अ उतारा, आधार कार्ड, बँक पास बुक झेरॉक्स, स्वयंम घोषणा पत्र या कागदपत्रांची आवश्यकता आहे. तरी कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीच्या वतीने सभापती गणेश पाटील व उपसभापती प्रकाश पाटील, प्रकाश तांबे, युसुफ पटेल, सुनिल पाटील, लखीचंद पाटील, राहुल पाटील, शामकांत पाटील, विजय पाटील, राहुल संघवी या संचालकांनी केले आहे.